LIVE
मुंबई

मुंबईतील ऐतिहासिक खोताची वाडी पर्यटकांचे आकर्षण ठरतेय, गिरगावमधील मिनी गोव्याचा अनुभव

मुंबईच्या धावपळीच्या गर्दीत गिरगावमधील खोताची वाडी हे शांत आणि ऐतिहासिक ठिकाण पर्यटकांना भुरळ घालत आहे. पोर्तुगीज धाटणीची रंगीबेरंगी कौलारू घरं आणि लाकडी बंगले पाहण्यासाठी परदेशातूनही लोक इथं भेट देतात.
मुंबईतील ऐतिहासिक खोताची वाडी पर्यटकांचे आकर्षण ठरतेय, गिरगावमधील मिनी गोव्याचा अनुभव

मुंबई म्हणजे गगनचुंबी इमारती आणि लोकलची गर्दी असे चित्र डोळ्यांसमोर येते. मात्र गिरगाव भागात वसलेली ऐतिहासिक खोताची वाडी याला अपवाद ठरत आहे. या ठिकाणी पाऊल ठेवताच मुंबईकरांना एखाद्या जुन्या गोव्यात किंवा पोर्तुगालमधील गावात आल्यासारखा भास होतो. या परिसराचे सौंदर्य अनुभवण्यासाठी स्थानिक नागरिकांसह परदेशातूनही मोठ्या संख्येने पर्यटक येत आहेत.

खोताची वाडीचा इतिहास १८व्या शतकाच्या उत्तरार्धातील आहे. वामन हरी खोत या जमीनमालकांच्या नावावरून या जागेला हे नाव मिळाले. त्यांनी जमिनीचे छोटे भूखंड करून स्थानिक कुटुंबांना राहण्यासाठी दिले होते. त्यानंतर ईस्ट इंडियन ख्रिश्चन समुदायातील लोकांनी इथं सुंदर घरं उभारली. मुंबई पालिकेने १८८० मध्ये या वस्तीला अधिकृतपणे नाव दिले. लाल, निळ्या आणि पिवळ्या रंगातील कौलारू घरं, लाकडी खिडक्या आणि व्हरांडे हे इथले मुख्य वैशिष्ट्य आहे.

शांत वातावरण, अरुंद रस्ते आणि ऐतिहासिक इमारतींमुळे या भागाला मिनी गोवा असेही म्हणतात. १९९५ मध्ये या वाडीला ग्रेड-३ हेरिटेज दर्जा मिळाला होता. पूर्वी या ठिकाणी सुमारे ६५ पारंपरिक बंगले होते. पण आधुनिक काळात झालेल्या नव्या बांधकामांमुळे आता मोजकीच जुनी घरं शिल्लक राहिली आहेत. तरीही या जुन्या भिंतींमधून मुंबईच्या प्राचीन वास्तुकलेची माहिती मिळते.

सध्या छायाचित्रकार, आर्किटेक्चर अभ्यासक आणि इतिहासप्रेमी या ठिकाणी आवर्जून भेट देत आहेत. मुंबईच्या मध्यवर्ती भागात असलेला हा ऐतिहासिक वारसा जपणे अत्यंत गरजेचे बनले आहे. धावपळीच्या आयुष्यात थोडा वेळ शांततेत घालवण्यासाठी खोताची वाडी हा एक उत्तम पर्याय ठरत असून पर्यटक येथील फोटोग्राफीचा आनंद घेत आहेत.

TAGS: #खोताची वाडी #गिरगाव #मुंबई पर्यटन #मिनी गोवा #मुंबई हेरिटेज #जुनी मुंबई
Share करा:

संबंधित बातम्या

नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयातील डॉक्टरवर निलंबनाची कारवाई, महिला रुग्णाचा विनयभंग केल्याचा आरोप

18 तासांपूर्वी

कुर्ल्यातील मदरशावर महानगरपालिकेची कारवाईची हालचाल सुरू, स्थानिकांचे सर्व आरोप फेटाळले

18 तासांपूर्वी

मुंबईकडे कोयनेचे पाणी वळविण्याचा प्रस्ताव तातडीने रद्द करा, पश्चिम महाराष्ट्रातून तीव्र मागणी

2 दिवसांपूर्वी

भिवंडीतील गौरीपाडा भागात धोकादायक इमारतीचा भाग कोसळल्याने महिलेसह चार जण जखमी

2 दिवसांपूर्वी
📱 WHATSAPP वर मिळवा
दर तासाला ताज्या बातम्या
Join करा →