LIVE
मुंबई

भिवंडीतील गौरीपाडा भागात धोकादायक इमारतीचा भाग कोसळल्याने महिलेसह चार जण जखमी

भिवंडी शहरातील गौरीपाडा परिसरात धोकादायक इमारतीचा भाग दोन घरांवर कोसळला. या दुर्घटनेत एका महिलेसह तीन मुले जखमी झाली असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.
भिवंडीतील गौरीपाडा भागात धोकादायक इमारतीचा भाग कोसळल्याने महिलेसह चार जण जखमी

भिवंडी शहरात गौरीपाडा परिसरात एक मोठी दुर्घटना घडली असून येथे एक धोकादायक इमारत अचानक कोसळली आहे. या इमारतीचा कडाडलेला भाग आणि मोठा ढिगारा शेजारी असलेल्या दोन घरांच्या पत्र्यांवर जाऊन आदळला. घरांचे पत्रे फुटून हा सर्व ढिगारा थेट घरात झोपलेल्या नागरिकांच्या अंगावर पडल्यामुळे खळबळ उडाली. या भीषण घटनेत एका महिलेसह तीन लहान बालके गंभीर जखमी झाली आहेत.

या अचानक घडलेल्या दुर्घटनेत ५५ वर्षीय अबिदा मोमीन, १२ वर्षीय खालिद मोमीन, ६ वर्षीय उमैरा अन्सारी आणि १२ वर्षीय रैय्यान अन्सारी हे चौघे जण जखमी झाले आहेत. या सर्व जखमींच्या डोक्याला आणि हातापायांना गंभीर दुखापती झाल्या आहेत, त्यांना तात्काळ उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

गौरीपाडा भागातील या दुर्घटनेनंतर भिवंडी महापालिकेच्या कारभारावर नागरिकांकडून पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. यापूर्वी घडलेल्या कोहिनूर इमारत दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू झाला होता, पण त्यानंतरही प्रशासनाला जाग आली नाही. शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न अजूनही कायम असल्याचे या ताज्या घटनेने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.

धोकादायक इमारती वेळेत खाली करून पाडण्याची किंवा लोकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याची जबाबदारी महापालिकेची नाही का, असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे. एखाद्या नागरिकाचा जीव गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा रोख सवाल स्थानिकांनी उपस्थित केला असून यावर प्रशासनाला कठोर पावले उचलणे भाग पडणार आहे.

TAGS: #भिवंडी बातमी #इमारत दुर्घटना #गौरीपाडा #महापालिका #जखमी
Share करा:

संबंधित बातम्या

मुंबईकडे कोयनेचे पाणी वळविण्याचा प्रस्ताव तातडीने रद्द करा, पश्चिम महाराष्ट्रातून तीव्र मागणी

1 दिवसांपूर्वी

पनवेल ते बदलापूर प्रवास आता अवघ्या २० मिनिटांत होणार असून दिल्ली गाठणे देखील सोपे पडणार

1 दिवसांपूर्वी

मुंबई आणि ठाण्यात रिक्षाचालकांच्या संपाची हाक पण सेवा सुरूच

1 दिवसांपूर्वी

मुंबईतील रस्त्यांवरील उघड्या मॅनहोलचा धोका टळणार; पालिका बदलणार 400 झाकणे

1 दिवसांपूर्वी
📱 WHATSAPP वर मिळवा
दर तासाला ताज्या बातम्या
Join करा →