LIVE
क्राईम

लग्नाचे अमिश दाखवून कल्याणमध्ये दिव्यांग महिलेची ८ लाख रुपयांची फसवणूक, आरोपीवर गुन्हा दाखल

फेसबुकवर ओळख झाल्यानंतर लग्नाचे अमिश दाखवून एका दिव्यांग महिलेकडून ८ लाख रुपये उकळल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी कल्याण येथील महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लग्नाचे अमिश दाखवून कल्याणमध्ये दिव्यांग महिलेची ८ लाख रुपयांची फसवणूक, आरोपीवर गुन्हा दाखल

फेसबुकवरील ओळख आणि लग्नाच्या खोट्या आश्वासनाला बळी पडल्याने कल्याणमधील एका ३५ वर्षीय दिव्यांग महिलेची लाखो रुपयांची फसवणूक झाली आहे. आरोपीने सुरुवातीला सहानुभूती दाखवून मैत्री केली आणि नंतर लग्नाचा प्रस्ताव ठेवून महिलेचा विश्वास संपादन केला. यानंतर स्वतःच्या अडचणींचे कारण सांगत त्याने महिलेला बँक कर्ज काढण्यास भाग पाडले.

आरोपीच्या सांगण्यावरून पीडित महिलेने बँकेकडून तब्बल ८ लाख ८० हजार रुपयांचे कर्ज घेतले. त्यातील ८ लाख रुपये तिने ऑनलाईन आणि रोख स्वरूपात आरोपीला दिले. मार्च २०२६ पर्यंत पैसे परत करण्याचे लेखी आश्वासन आरोपीने १०० रुपयांच्या कागदावर दिले होते. मात्र त्यानंतर आरोपीच्या कुटुंबीयांनी महिलेच्या अपंगत्वाचे कारण पुढे करत लग्नाला थेट नकार दिला.

कर्ज फेडण्यासाठी सुरुवातीला फक्त दोन हप्ते दिल्यानंतर आरोपीने पैसे देणे पूर्णपणे बंद केले. स्वतःचे बँक रेकॉर्ड खराब होऊ नये म्हणून पीडित महिला शारीरिक अडचणींवर मात करत दरमहा स्वतःच कर्जाचे हप्ते भरत होती. आरोपीने फोन उचलणे बंद केल्यावर आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले.

आपली फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पीडित महिलेने अखेर पोलिसांत धाव घेतली. गुरूवारी १९ नोव्हेंबर रोजी नोंदवलेल्या तक्रारीवरून कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंदवला असून अधिक तपास सुरू केला आहे.

TAGS: #कल्याण बातमी #कल्याण गुन्हा #फसवणूक #कल्याण पोलीस #मुंबई लोकल न्यूज
Share करा:

संबंधित बातम्या

मुंबईतील लाईव्ह कॉन्सर्टमध्ये अमली पदार्थ सेवनाचा संशय, अँटी नार्कोटिक्स सेलच्या कारवाईत १२ जण पॉझिटिव्ह

1 दिवसांपूर्वी

कल्याणमध्ये नकली केस आणि आडनावावरून दोन गटांत राडा, परस्परविरोधी तक्रारी दाखल

3 दिवसांपूर्वी

मिरा रोड परिसरात १७ वर्षीय मुलीवर अत्याचार, मैत्रिणीसह चार जणांवर गुन्हा दाखल

3 दिवसांपूर्वी

कुर्ला फिनिक्स मॉलजवळ जोडप्याला बेदम मारहाण, दगड आणि बेल्टचा वापर करत आठ जणांना घेतले ताब्यात

3 दिवसांपूर्वी
📱 WHATSAPP वर मिळवा
दर तासाला ताज्या बातम्या
Join करा →